Thursday, February 13, 2014
Thursday, February 06, 2014
फुटबॉलप्रेमी गांधीजी....
दक्षिण आफ्रिकेत १८९६ मध्ये ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये मोहनदास करमचंद गांधी महत्त्वाची भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेत १८९६ मध्ये ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतीयांच्या गटामध्ये एका तरुण, दक्षिण आफ्रिकेत फारशा परिचित नसलेल्या एका वकिलाचा समावेश होता आणि ते होते मोहनदास करमचंद गांधी. मिशीगन विद्यापीठात आफ्रिकेच्या इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या पीटर अॅलेगी यांच्या मते या खंडातील अश्वेत लोकांची ही पहिली फुटबॉल संघटना होती.
या खेळाची लोकप्रियता गांधीजींच्या लक्षात आली. हा खेळ पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसल्यावर, गांधीजी या खेळाचा वापर सामाजिक जागृतीसाठी करू लागले. ज्या वेळी सामने सुरू असत त्यावेळी गांधीजी प्रेक्षकांमध्ये फिरून पत्रके वाटत व त्यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या इनडोअर फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पुबालन गोविंदस्वामी यांनी ‘फिफा डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या फुटबॉलप्रेमावर अधिक प्रकाश टाकला.
त्या काळी एकहाती विजय मिळवून देणा-या एखाद्या खेळाडूपेक्षा सांघिक भावना जपणा-या या खेळाची संकल्पना गांधीजींना अधिक भावली. संघ भावना म्हणजेच सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून देण्याची क्षमता या खेळात आहे, असे त्यांना वाटले. अधिकाधिक लोकांना हा खेळ एकत्र आणू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ व ‘क्लिप रिव्हर डिस्ट्रिक्ट इंडियन फुटबॉल असोसिएशन’ यांसारख्या लहान संघटना स्थापन केल्यावर १९०३ मध्ये ‘साउथ आफ्रिकन असोसिएशन ऑफ हिंदू फुटबॉल’ स्थापन करण्यात आली.
गांधीजी भारतात परतल्यानंतर मात्र त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेले क्लब बंद पडले. तरीही भारतीय वंशाच्या लोकांनी इतर नवे क्लब सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल चालू ठेवले. दुसरीकडे भारतात परतल्यावर गांधीजींचे मतपरिवर्तन झाले. खेळांविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनात बदल झाला. भारतीयांनी खेळापेक्षा शेतीसारख्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे ते सांगू लागले. खेळ म्हणजे वेळ घालवण्याचे एक साधन आहे व भारतीयांनी शेतावर अधिक तास घालवले पाहिजेत आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान दिले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये व त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतूनही त्यांचा खेळाविषयीचा बदललेला दृष्टिकोन दिसून येतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल संघटनांशी असलेले त्यांचे संबंध त्यांनी कायम ठेवले.
फुटबॉल
फुटबॉल : फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे :
१. असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि
२. रग्बी.
सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय.
सॉकर (असोसिएशन फुटबॉल) : फुटबॉलच्या नियमांना व कायदेकानूंना अधिकृत रूप देण्यासाठी २६ जुलै १८६३ मध्ये लंडन येथे ‘फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली, त्याच वर्षी ‘असोसिएशन फुटबॉल ’ ही संज्ञा व तिचे बोलीभाषेतील रूप ‘सॉकर’ हेही रूढ झाले. पुढील वीस वर्षात आधुनिक फुटबॉल चांगलाच स्थिरावला. १८८३ च्या सुमारास चेंडू सरकवण्याचे (पासिंग) तंत्र विकसित झाल्याने संघरचनेतही काही फेरफार झाले : एक गोलरक्षक, दोन पूर्ण-पिछाडी, तीन निम्न पिछाडी व पाच आघाडी खेळाडू अशी आधुनिक रचना अस्तित्वात आली. जगातला सर्वात जुना क्लब इंग्लंडचा ‘शेफील्ड फुटबॉल क्लब’ (१८५७) होय. इंग्लंडमध्ये सॉकरचा पहिला अधिकृत सामना १८६६ मध्ये लंडन विरूद्ध शेफील्ड या दोन क्लबांमध्ये झाला. १८७१ साली ‘फुटबॉल चॅलेंज कप ’ सामने सुरू झाले. याच सुमारास इंग्लंडमधील निरनिराळ्या फुटबॉल क्लबांतून धंदेवाईक खेळाडू खेळू लागल्यामुळे हौशी खेळाडूंची कुचंबणा होऊ लागली, म्हणून १८९३ साली हौशी खेळाडूंसाठी ‘फुटबॉल असोसिएशन अमॅच्युअर कप ’ सामने सुरू झाले. अल्पावधीतच हा खेळ जगभर लोकप्रिय झाला व त्याचे नियमन करण्यासाठी ‘फेडरेशन इंटरनॅशनेल दी फुटबॉल असोसिएशन ’ (एफ्. आय्. एफ्. ए.) ही जागतिक संघटना १९०४ साली पॅरिसमध्ये स्थापना झाली. या संघटनेमार्फत १९३० पासून विश्वकरंडक (वर्ल्ड कप) स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या. दर चार वर्षांनी भरणार्या या स्पर्धांमध्ये प्रमुख देशांचे राष्ट्रीय संघ भाग घेत असतात. सॉकरचा ऑलिंपिक सामन्यांमध्ये १९०८ पासून व आशियाई सामन्यांमध्ये १९५२ पासून समावेश करण्यात आला. १९५५ साली फक्त यूरोपीय देशांपुरत्या ‘ यूरोपियन करंडका’ च्या सामन्यांना प्रारंभ झाला.
सॉकर या खेळामध्ये अनेक प्रकारचे जागतिक विक्रम आजतागायत प्रस्थापित झाले आहेत. जागतिक अजिंक्यपदासाठी दर चार वर्षानी ज्या विश्वकरंडक स्पर्धा भरवण्यात येतात; त्यांत ब्राझीलने एकूण तीन वेळा अजिंक्यपद मिळविले व ‘ज्यूल्स रिमेट ट्रॉफी ’ कायमची पटकावली. त्यानंतर १९७४ पासून ‘एफ्. आय्. एफ्. ए. कप’ ठेवण्यात आला.

जगद्वितख्यात फुटबॉलपटू पेलेचा भारतातील खेळ : कॉसमॉस वि. मोहन बगान, कलकत्ता, १९७७.
भारतात खेळला जाणारा फुटबॉल हा मुख्यत्वेकरून सॉकर या प्रकारचाच आहे. हा खेळ ब्रिटिशांनी भारतात आणला. प्रथम तो कलकत्त्यात खेळला गेला व तदनंतर इतरत्रही लोकप्रिय झाला. ‘ट्रेडर्स कप’ साठी १८८९ साली पहिल्या स्पर्धा खेळल्या गेल्या. कलकत्ता येथे ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’ स्थापना (१८९३ ) होऊन, तिच्या वतीने ‘आय्. एफ्. ए. शील्ड ’ ची स्पर्धा १८९३ पासून सुरू झाली. १८९१ पासून ‘रोव्हर्स’ करंडक सामने सुरू झाले. त्यांत हैदराबाद पोलीस संघाने १९५० ते ५४ पर्यंत ओळीने पाच वर्षे अजिंक्यपद मिळविले. त्या स्पर्धेतला हा विक्रम अद्याप अबाधित आहे. कलकत्त्यापाठोपाठ हा खेळ मुंबईमध्ये रूजला.१९११ मध्ये मुंबईला ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन’ ही संघटना स्थापन झाली. ‘फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ ही मध्यवर्ती संस्था १९३७ साली स्थापन झाली व त्यामुळे भारतातील फुटबॉल स्पर्धांना सुसंघटित स्वरूप प्राप्त झाले. १९४१ पासून राष्ट्रीय विजेतेपदासाठी ‘संतोष ट्रॉफी’चे सामने खेळले जाऊ लागले. याशिवाय ‘ड्युरंड कप’ व ‘डी. सी. एम्. (दिल्ली क्लॉथ मिल्स) कप’ या फुटबॉल स्पर्धाही महत्त्वपूर्ण आहेत. भारताने ऑलिंपिक सामन्यांत १९४८ मध्ये प्रथमच आपला फुटबॉल संघ उतरवला. १९५६ साली मेलबर्न येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. १९६२ साली जाकार्ता येथील आशियाई फुटबॉल स्पर्धांमध्ये भारताला अजिंक्यपद मिळाले. चुनी गोस्वामी हा त्या संघाचा कप्तान होता. दरवर्षी आशियाई राष्ट्रांसाठी मर्डेका फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांत भारतीय संघ भाग घेतो. तसेच शालेय खेळाडूंसाठीही एक वेगळी आशियाई फुटबॉल स्पर्धा भरवली जाते. सध्याच्या उत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये महंमद अकबर व हबीब हे बंधू, श्याम थापा, इंदरसिंग, शबीर अली, बिडेश बोस, झेव्हियर पायस, सुरजीत सेनगुप्ता हे आघाडी खेळाडू प्रसिद्ध आहेत. बचाव फळीत खेळणारा गौतम सरकार आणि गोलरक्षक भास्कर गांगुली व शिवजी बॅनर्जी या खेळाडूंनीही नाव मिळवले आहे. यांखेरीज मानस भट्टाचार्य, फ्रॅन्सीस, नेव्हील परेरा इत्यादींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
फुटबॉल : फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे :
१. असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि २. रग्बी.

Subscribe to:
Comments (Atom)